पहा कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस?
मुंबई प्रतिनिधी :- हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडत आहे, तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. काल 28 सप्टेंबर गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनं करण्यात आलं आहे.
What's Your Reaction?