नासाच्या प्रशिक्षणासाठी 20 ऑगस्टला निवड चाचणी
बीड( प्रतिनिधी) : अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या( नासा) सहकार्याने हंटसविले, अल्बमा येथे उभारलेल्या युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर मधील नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनल च्या वतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून ,या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 करण्यात आल्याची माहिती यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अॅबेसिडर व स्वान फाउंडेशनच्या संचालिका सुदेशना परमार यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली, तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशनच्या संकेतस्थळावरून अधिक ची माहिती घेऊन जास्तीत जास्त संख्येने नासाच्या प्रशिक्षणासाठी निवड चाचणी परीक्षेस बसण्याचे आवाहन करिअर कौन्सिलर डॉ. संजय तांदळे बीड यांनी केले आहे.
What's Your Reaction?