मनोज जरांगे यांना विधान मंडळात पाठवा! सुरेश पाटोळे
बीड प्रतिनिधी
महाराष्ट्रात अनेक मोठमोठे घराणे आहेत की त्यांच्याकडे साखर कारखाने, शिक्षण संस्था, दूध संस्था, विविध प्रकारच्या संस्था असल्याने श्रीमंत मराठे आजपर्यंत सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे गरीब मराठ्यांना राजकीय फायदा व आर्थिक लाभ मिळाला नसल्याने गरीब आणि श्रीमंत यांची दरी वाढत गेली. त्यामुळे आता गरीब मराठा बांधवांना आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची आणि नोकऱ्यांची चिंता वाटू लागल्याने आरक्षण आपल्यालाही असावे असे विचार मनात येत असल्याने आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे आरक्षण मिळावे म्हणून अनेकांनी आज पर्यंत बलिदान दिलेले आहे. यांची चिंता कोणालाच दिसत नाही. अजूनही गरिबांचे जीव जाण्याची वाट हे सरकार पाहत आहे काय? देता येत नसेल तर सरकारने राजीनामा देवून मध्यावर्ती निवडणूक घ्या. त्यात श्रीमंत मराठे आणि निवडूण दिलेल्या प्रतिनिधीला मतदान न करता गरीब मराठा विषेतः मनोज जरांगे पाटलांसारखे आमदार व खासदार निवडून दया. आमच्या ताब्यात सत्ता दया, मी आपणास शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण देतो. आता मराठ्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आडून न बसता स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्या. सत्तेमध्ये जाऊन आपल्याला आरक्षण मिळवून घेण्याची वेळ आली आहे अशी माहिती शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटोळे पाटील यांनी मांडले आहेत. त्यांनी नुकतीच पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही व पिठ्ठी या गावात चालू असलेल्या अन्नत्याग आंदोलनास भेटी दिल्या त्यावेळी ते बोलत होते. श्रीमंत मराठे गरीब, कष्टकरी समाजाला लुटण्याचे महापाप करताना आपल्याला पहावयास मिळत आहेत त्यामुळे आपण रडत न बसता लढण्याची भाषा करून येत्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये मनोज जरांगे सारखे गरीब मराठी वाघ निवडून दिल्यास आणि मुख्यमंत्री मराठेत्तर व्यक्ती निवडल्यास मराठ्यांना चुटकीसरशी शिक्षणात व नोकऱ्यात आरक्षण मिळू शकते, अशी माहिती अन्नत्याग आंदोलनाच्या भेटी दरम्यान सुरेश पाटोळे पाटील यांनी बोलून दाखवली. उपोषण व अन्नत्याग करून मरण्यापेक्षा विधान मंडळात मनोज जरांगे पाटलांसारखे गरिबांचे वाघ पाठवल्याशिवाय गरीब व कष्टाळू मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळणार नाही. असे परखड मत सुरेश पाटोळे पाटील यांनी मांडले. शांततेत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचे आणि आया-बहिणीवर, वारकऱ्यांवर लाठी आणि काठीचा मारा करणाऱ्या पोलिसांचा आणि त्यांना आदेश देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा शिव संघर्ष ग्रुपच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो..! सुरेश पाटोळेपाटील यांनी नुकतीच पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही व पिठ्ठी या गावांना भेट देऊन चालू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
What's Your Reaction?