शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला गेले
Read about the recent meeting between Sharad Pawar and Chief Minister Shinde as they discuss important matters of mutual concern. Explore the highlights and outcomes of the meeting in this article
राष्ट्रवादीचे शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल गेले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा शरद पवार हे वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेलेआहेत. ही भेट नेमकी कशासाठी होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पवार आणि शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. यातच राज्यातला असा कोणता मुद्दा आहे, ज्यासाठी शरद पवार हे स्वतः शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत, याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.
What's Your Reaction?






