शरद पोंक्षेने चांगल्या डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत! काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

शरद पोंक्षे नावाचा एक सुमार दर्जाचा नट प्रसिद्धीसाठी अधून मधून निरर्थक बडबड करत असतो. मालेगांव येथे बोलत असताना राहुल गांधी हे खरंच गांधी आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांचे आजोबा फिरोज गांधी यांचे मूळ आडनाव खान असल्याचा व राहुल गांधी हे सावरकरही नाहीत आणि गांधीही नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांना आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही तर सावरकरांचा इतिहास कसा माहीत असणार, अशी टीका विकृत आणि सडक्या विचाराच्या पोंक्षेने केली आहे. राहुलजी गांधी यांच्याबद्दल बोलण्याएवढी शरद पोंक्षेची लायकी नाही, त्याने मर्यादा पाळावी अन्यथा आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिला आहे.
यापूर्वीही पुण्यातील एका कार्यक्रमात या नौटंकीबाज नटाने काँग्रेस नेते मा. खा. राहुलजी गांधी यांच्याबद्दल हीन दर्जाची भाषा वापरली होती. राहुल गांधींना गोळवलकर हा शब्द उच्चारता येत नाही असे म्हणताना शरद पोंक्षे नेहमीप्रमाणे एकेरी भाषेत बरळला होता. गोळवलकरांचे नाव घ्यावे असे त्यांनी काय महान कार्य केले आहे. ते काही महापुरुष नाहीत आणि त्यांचे देशाच्या जडणघडणीत काही योगदानही नाही आणि ते समाजसुधारकही नव्हते. शरद पोंक्षेवर कोणते संस्कार झालेले आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.
प्रसिद्धीसाठी हा माणूस वायफळ बडबड करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. नट म्हणून शरद पोंक्षेला कोणीही फारसे ओळखत नाही. नाटक, सिनेमात काही चालत नाही म्हणून काँग्रेस नेत्यांबद्दल काहीतरी बरळणे किंवा वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहण्याची विकृती पोंक्षेला जडली आहे. शरद पोंक्षेने वेळीच चांगल्या डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत, त्याच्या उपचाराचा खर्च आम्ही देऊ. आम्हाला आमची संस्कृती सोडायची नाही पण आमच्या नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर येऊन टीका केली तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा काँग्रेस प्रवक्ते राजहंस यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






