मनसेचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

मनसेचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन
मनसेचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करत आहेत

आष्टी प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांनी माना टाकल्या असून पीक जिल्हाभर वाळत आहे तरी शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आंदोलनादरम्यान केली.य तीव्र निदर्शने आंदोलनात मोठया संख्येने जमलेल्या मनसैनिकांनी बराच काळ जोरदार घोषणाबाजी केली. तहसीलदार बाळदत्त मोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन करण्यात आली.ज्यात जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासोबतच वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी व पूढील काळात शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी हरीण, रानडुक्कर या

वन्यप्राण्यांचा प्रतिबंध करावा,जिल्हयातील पिके वाळत असल्याने पिक विमा कंपनीने जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी,992 व इतर सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या बिजोत्पादन कंपन्यावर कडक कार्यवाही करावी तसेच खत बीयाण्याची लिंकीग, चढयादराने खत बियाण्याची व किटकनाशकाची विक्री करणाऱ्या कृषी दुकानदारांवर कार्यवाही करावी,गोगलगाय व इतर रोगांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी,माजी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांची शिफारस स्वीकारुन त्यानुसार खरीप व रब्बी पेरणीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी,प्रचंड नूकसान होऊनही पिकविमा कंपण्या शेतकऱ्यांना विमा देत नाहीत कंपण्या स्वतःच्या नफेखोरीसाठीच काम करतात असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे असा मनमानी कारभार करणाऱ्या कंपण्यांना ब्लॅकलिस्टेड करावे व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपण्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अश्या शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक बाबींचा समावेश आहे.यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले यावेळी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, उपजिल्हाध्यक्ष सतिष शिंदे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे,उपतालुकाध्यक्ष मच्छिंद्र गरजे,उपतालुकाध्य सुनिल पाचपुते,अक्षय मडके,भरत चव्हाण आदींसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow