बाळाच्या डोळ्यात काजळ घालावे की नाही? जाणून घ्या!

पूर्वी आपल्या छोट्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून आई तीट-टिळा लावून, त्याच्या डोळ्यात काजळ घालून सजवत. सध्या मात्र डॉक्टर बाळाच्या डोळ्यात काजळ घालण्यास नकार देतात. चला तर, बाळावर काजळाचा काय परिणाम होतो? हे पाहूया!
● काजळ तयार करण्यासाठी 50 टक्के शिसे वापरले जाते. हे अविकसित बालकाच्या शरीराच्या स्वास्थ्यावर चांगला परिणाम करते.
● घरी तयार केलेले काजळ नैसर्गिक घटकांनी बनवले असल्याने ते वारपण्यास सांगितले जाते, मात्र हेही सुरक्षित नाही कारण काजळ बोटांनी लावले जाते. यामुळे बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो.
● बाळाच्या डोळ्यात काजळ घातल्याने डोळे मोठे होतात असा गैरसमजही आहे. मात्र डोळ्यात काजळ घातल्याने डोळे मोठे होत नाहीत.
● डोळ्यात काजळ घातल्याने बाळ बराच वेळ शांत झोपून राहते हा गैरसमज आहे. नैसर्गिकरित्या लहान मुलं 18 ते 19 तास झोपतात.
● काही वेळा सुंदर डोळ्यांकरिताही डोळ्यात काजळ घातले जाते, मात्र काजळामुळे डोळ्यांच्या मांसपेशीत बदल होत नाही. त्यामुळे कमी किंवा जास्त कसेही काजळ घातले तरी डोळ्यांच्या आकारात बदल होत नाही.
● काजळामुळे नकारात्मक शक्तींपासून रक्षण होते तसेच दृष्टी प्रभावित होते, असे म्हणतात. मात्र याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
What's Your Reaction?






