ज्ञानश्री सायन्स क्लासेस मध्ये श्री गणेश मूर्तीचे थाटात आगमन

ज्ञानश्री सायन्स क्लासेस मध्ये श्री गणेश मूर्तीचे थाटात आगमन

आष्टी(अण्णासाहेब साबळे) भाद्रपद मासात तुम्हा-आम्हा सर्वाच्या लाडक्या गणरायाचं आगमन होत असलं तरी त्याच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने आधीपासूनच वाट पाहत असतात.घरगुती गणपती असो की सार्वजनिक, किंवा क्लासमधील सर्वजण एकजुटीने त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. त्यामुळे घरीदारी आनंदाचं, उत्साहाचं, प्रेमाचं वातावरण आपोआप तयार होतं आणि त्यामुळे सर्वजण एकत्र येतात.परिणामी सर्वत्र सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते.आपल्या सण-उत्सवांचे हे वैशिष्टय़ आहे की त्या निमित्ताने नाती दृढ व्हावीत आणि भेदभाव गळून पडावेत.अशी व्यापक विचारधारा घेऊन येणारे

आष्टी मधील ज्ञानश्री सायन्स क्लासेस जाणीवपूर्वक क्लासेसमध्ये गणेशोत्सवाचा उपक्रम राबवत आहेत आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.विशेषत्वाने उल्लेख करण्याजोगी बाब म्हणजे मागील आठ दिवसांपासून क्लासेस मधील लहान मोठे सर्व विद्यार्थी गणेश आगमनासाठी तयारी करत होते.गणेशपूजन हे निसर्गाशी नाते सांगणारे असेच आहे.या सर्व विद्यार्थ्यांना गणेश मूर्तीच महत्त्व,गणपतीची सजावट,पूजेची तयारी,नैवेद्य इ.विषयीची माहिती सांगितली जाते.क्लासमध्ये आणलेली गणेशाची सुंदर प्रतिमा,मोदक, जास्वदींची फुले,गणपतीसाठी बनवलेली सजावट चटकन लक्ष वेधून घेते.लहान वयात केलेले संस्कार मुलांवरती कायमस्वरूपी ठसा उमटवतात आणि त्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देतात.त्यामुळे अशा तऱ्हेचा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय आहे.आष्टी मधील ज्ञानश्री क्लासेस मध्ये श्री.नाईक सर यांच्या मार्गदर्शनातून क्लासमध्ये गणेशमूर्तीची स्थापना केली जाते.मागील दोन वर्षापासून त्यांच्या क्लास मध्ये ही परंपरा जोपासली जाते.या उत्सवांमध्ये विद्यार्थ्यांना आवर्जून सामावून घेतले जाते.

गणेशचतुर्थीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गणेशाचे आगमन होते. खरं तर तो एक सुंदर आणि संस्मरणीय अनुभव असतो. क्लासमध्ये विद्यार्थ्यांतर्फे गणपतीची यथासांग पूजा केली जाते,आरत्या म्हटल्या जातात. सकाळ,संध्याकाळ आरती,प्रसाद अशी व्यवस्था केली जाते.सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या उत्सवाची तयारी करतात आणि एकदिलाने,एकजुटीने उत्साहाने उत्सव साजरा करतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow