बॅनर मुक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहीम सुरू

बीड प्रतिनिधी:- शहरातील रहदारीच्या प्रमुख चौकातील महापुरुषांची स्मारके उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी महापुरुषांच्या स्मारकाभोवती २०० मीटर परिसरात अनाधिकृत होर्डिंग्ज लावण्यात येऊ नयेत तो परीसर बॅनर मुक्त राहील व स्मारकाचे पर्यायाने शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच वाहतुकीची कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होईल यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.११ सप्टेंबर सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी समोर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.निवेदन जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड, पोलिस अधीक्षक बीड यांना देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, मिलिंद सरपते,सुदाम तांदळे, नितीन सोनावणे, वैभव चक्रे,हमीद पठाण, बाबासाहेब पवार, अभिमान शेलार, सुभाष बांगर,आदि.सहभागी होते.
बीड शहरातील प्रमुख चौकातील जसे की छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या स्मारकाभोवती विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना त्यांच्या (राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, वाढदिवस, महापुरुषांच्या जयंती , पुण्यतिथी) आदि. विविध कार्यक्रम निमित्ताने अनाधिकृत नगरपरिषदेची परवानगी न घेता मोठमोठाले होर्डिंग्ज व फ्लेक्स लावत आहेत त्यामुळे महापुरूषांच्या स्मारकांचे पर्यायाने शहराचे विद्रुपीकरण होत असुन शहरातील मुख्य चौकात लावलेल्या होर्डिंग्ज मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असुन अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे होत असुन संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी एकमताने महापुरुषांच्या स्मारकाभोवती २०० मीटर परिसरात रस्त्यावर बांबु ठोकुन होर्डिंग्ज लावण्यात येणार नाहीत अशी दक्षता घेऊन आपल्या पदाधिकारी, कार्यकर्ते अथवा समर्थकांना तसे आवाहन करावे असे आवाहन करण्यात आले.
What's Your Reaction?






