मोदी पुन्हा सत्तेत विराजमान व्हावेत म्हणून पक्षांची तोडफोड सुरू !दत्ता प्रभाळे

मोदी पुन्हा सत्तेत विराजमान व्हावेत म्हणून पक्षांची तोडफोड सुरू !दत्ता प्रभाळे
दत्ता प्रभाळे काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष

मोदीजी तिसऱ्यांदा सत्तेत विराजमान व्हावेत म्हणूनच प्रादेशिक पक्षांची तोडफोड सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष दत्ता प्रभाळे यांनी शासकीय विश्रामगृह बीड परिसरातून माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

भाजपाची सत्तेसाठीची खेळी व अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा दोन महिन्यापूर्वी भाजपाचा एक अंतर्गत सर्व्हे झाला त्यात धक्कादायक माहिती समोर आली 2024 ला होणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होणार यात महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असणार आहे गेल्या वेळेस म्हणजेच 2019 ला भाजपा युतीस 48 पैकी महाराष्ट्रात 40 जागा मिळाल्या होत्या त्या यावेळेस घटून 11-12 वर येण्याची दाट शक्यता होती म्हणजेच सर्वाधिक फटका हा भाजपाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातच बसणार होता वाढती महागाई-बेरोजगारी सारख्या समस्यांमुळे भाजपाविरोधात देशात प्रचंड मोठा आक्रोश आहे त्यात महाराष्ट्रात घटणाऱ्या 28-30 जागेची भरपाई इतर राज्यातून निघणे अशक्य आहे म्हणूनच काहीच दिवसापूर्वी सत्तेसाठी अजितदादांशी वाटघाटी करत असताना देवेंद्र फडणवीसांना बाजूस करत अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपाने मान्य केली मात्र संघ व केंद्रातील काही बड्या नेत्यांचा अजितदादांना असलेला विरोध दादांचा भाजपासोबत सत्तेत येण्याचा मार्ग बरगळला मात्र यावेळेस असे झाले नाही संघ व इतर बड्या नेत्यांची समजूत घालण्यास मोदी-शाह जोडी यशस्वी झाली व दादांचा सत्तेत येण्याचा मार्ग सुकर झाला मात्र हा मार्ग उपमुख्यमंत्री पद मिळून सध्या तरी अपुराचा आहे हा मार्ग पुरा करण्यासाठी दादांना अनेक अडथळयांचा सामना करावा लागले म्हणजेच 10 ऑगस्टपर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिंदे गटाचे 16 आमदार विधानसभेत अपात्र करावे लागतील व त्याचसोबत दादांना एक तृतीय अंश म्हणजेच 36 आमदारांना आपल्यासोबत ठेऊन पक्ष चिन्ह व पक्षावर अधिकार दाखवायला लागले तरच 10 ऑगस्टनंतर दादा मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर दिसतील त्याचबरोबर भाजपकडून शिंदेना खुश करण्यासाठी त्यांच्या मुलास दिल्लीत एक मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले जाईल व उर्वरित शिंदे गटास विस्तारित मंत्रीमंडळात नव्याने सामील केले जाईल.

स्वायत्ता संस्थेचे(ईडी) भिती व जेलवारी:- पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात अजितदादा व अनेक राष्ट्रवादी नेत्यांवर शिखर बँक, सार्वजनिक बांधकाम व सिंचन घोटाळयाचा ठपका बसला त्याचाच फायदा भाजपाने उचलत ईडी-सीबीआय-आयटी सारख्या स्वायत्ता संस्थेचा गैरवापर करुन अजितदादा,सुनील तटकरे, छगन भूजबळ सारख्या बड्या नेत्यांना ब्लॅमेल करुन जेलमध्ये टाकण्याचा इशारा देऊ केला याबाबतीत पक्ष नेतृत्वाकडे बडे राष्ट्रवादी नेते जाहीररित्या बोलत असे मात्र नेतृत्व संजय राऊत व अनिल देशमुख यांचा दाखल देत येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे आहवान करत होते मात्र अनेक नेत्यांना उच्च रक्तदाब (B.P) व इतर आजार असल्या कारणांमुळे भाजपापुढे झुकती भूमिका घेऊन दादांसोबत सत्तेत जाण्याचा नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागला.

भविष्यातील भाजपाची वाटचाल :- महागाई,भ्रष्टाचार, महागाई सारख्या मुद्यामुळे भाजपाविरोधात प्रचंड जनतेत आक्रोश आहे मात्र आक्रोश कमी करण्यासाठी भाजप जातीय तिढा निर्माण करुन आपली हिंदू वोटबँक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र हा प्रयत्न यावेळेस यशस्वी होण्याची शक्यता दिसत नाही म्हणूनच सत्तेसाठी आपल्या आचार-विचारांस तिलांजली देत प्रादेशिक पक्षांची तोडफोड करुन नामवंत व जनाधर असलेल्या विरोधी नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचे काम कुटीलपणे भाजप करत आहे याला महाराष्ट्रात तरी बऱ्यापैकी यश येताना दिसत आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षाच्या तोडफोडीनंतर भाजपाच्या निशाण्यावर बिहारच्या नितेश कुमार यांचा पक्ष असू शकतो.एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सामदंडच वापर करुन भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता दिसत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow