खुर्शीद आलम यांना समाजसेवा दूत पुरस्कार

सामाजिक कार्यकर्ते खुर्शीद आलम यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजसेवादूत पुरस्काराने सन्मानित केले. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात.
बीड शहरामध्ये दिव्य वार्ता समूहाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते खुर्शीद आलम यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन दिव्यवार्ता समुहाचे वतीने त्यांना राज्यस्तरीय समाज सेवा दुत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी प्रसिद्ध कामेडियन जैन्या दादा, सिव्हिल सर्जन डॉ. साबळे साहेब,मा.आ. सिराजोद्दीन देशमुख साहेब, प्रा.सुशिलाताई मोराळे,पो.निरक्षक काशीद साहेब, प्रसिद्ध शायर काशिफ साहेब, राष्ट्रीय ओ बी सी अध्यक्ष शब्बीरअन्सारीसाहेब, मौ.शफिख साहेब, औरंगाबाद टाइम्सचे संपादक खुसरो, मोईन मास्टर साहेब, भागवत तावरे साहेब, शाकेर साहेब,जे.डी.शाहसाहेब, फारोक पटेल, सलीम जहाँगीर, शफिक भाऊ,आवेज कुरेशी, आदी मान्यवर उपस्थित होते, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते त्यांना सदर राज्यस्तरीय समाजसेवा दूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्या अभिनंदन केले जात आहे.
What's Your Reaction?






