अंमळनेर गटात समाजसेवक सुरेश पाटील यांचा दौरा

बीड (प्रतिनिधी)
तालुक्यातील अंमळनेर गटात शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांचा १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त दौरा असून विविध गावच्या शिव जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील हे सर्वधर्मातील गरिबांची जाणीव असललेले समाजसेवक आहेत. त्यामुळे नेहमी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. अंमळनेर गटात तर त्यांचे विशेष कार्य असल्याने शिवजयंती निमित्त सर्वांच्या आग्रहाखातर ते जयंतीच्या दिवशी अनेक गावांमध्ये दौरा करणार असून गावातील विविध समस्या जाणून घेवून शिव जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच अमळनेर गटात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. त्यामुळे या प्रश्नाला सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील प्रथम प्राधान्य देणार आहे. अर्धवट असलेल्या जनजीवन योजनेची माहिती सुद्धा ते घेणार असून त्यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांचे भेट घेणार आहेत. प्रत्येक गावाला पाणी मिळावे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. व इतर समस्याही जाणून घेणार आहेत. शिवजयंती उत्सवात सहभागी होणार आहेत.
What's Your Reaction?






