कुमार कोशाची लवकरच अद्ययावत ई-आवृत्ती

सुवर्णा चव्हाण : पुणे : राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे कुमार कोशाच्या पहिल्या खंडाच्या तिसर्‍या आणि चौथ्या भागांच्या ई-आवृत्तीचे काम पूर्ण झाले असून, येत्या महिन्याभरात मंडळाच्या संकेतस्थळावर ई-आवृत्ती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर खंडाच्या तिसर्‍या आणि चौथ्या भागांची छापील आवृत्तीही प्रकाशनाच्या वाटेवर असून, आता कुमार कोशाच्या पहिल्या खंडाचे काम पूर्णत्वास आले आहे. चारही भाग मिळून पहिल्या … The post कुमार कोशाची लवकरच अद्ययावत ई-आवृत्ती appeared first on पुढारी.

कुमार कोशाची लवकरच अद्ययावत ई-आवृत्ती

सुवर्णा चव्हाण :

पुणे : राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे कुमार कोशाच्या पहिल्या खंडाच्या तिसर्‍या आणि चौथ्या भागांच्या ई-आवृत्तीचे काम पूर्ण झाले असून, येत्या महिन्याभरात मंडळाच्या संकेतस्थळावर ई-आवृत्ती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर खंडाच्या तिसर्‍या आणि चौथ्या भागांची छापील आवृत्तीही प्रकाशनाच्या वाटेवर असून, आता कुमार कोशाच्या पहिल्या खंडाचे काम पूर्णत्वास आले आहे. चारही भाग मिळून पहिल्या खंडाच्या 1025 नोंदी उपलब्ध असणार आहेत.

कुमार कोशाच्या कामाला गती मिळाली असून, ई-आवृत्तीच्या प्रकाशनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
कुमार कोशाबद्दल माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित म्हणाले, कुमार कोशाचे एकूण बारा खंड तयार करण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या खंडाचे दोन भाग आधीच प्रकाशित झाले आहेत. तर तिसर्‍या आणि चौथ्या भागांचे कामही पूर्ण झाले असून, सुरुवातीला मंडळाच्या संकेतस्थळावर या दोन भागांची ई-आवृत्ती महिन्याभरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-आवृत्तीचे अनावरण महिन्याभरात होणार असून, त्यानंतर छापील आवृत्तीही दोन महिन्यानंतर प्रकाशित होणार आहे. होमी भाभा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन यांचे आम्ही खंडासाठी सहकार्य घेतले आहे. विश्वकोश खंडांची पहिली आवृत्ती पूर्वीच प्रकाशित झाली आहे. तर द्वितीय आवृत्तीचे आणि ऑलिम्पिक कोशाचेही काम सुरू आहे.

कुमार कोशाचे स्वरूप
कुमार कोश हा नववी ते बारावीतील म्हणजे 14 ते 18 वयोगटातील मुलांसाठी तयार करण्यात येत आहे. कुमार कोशाचे एकूण बारा खंड तयार करण्यात येणार आहेत. कुमार कोशाचा पहिला खंड हा ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ याविषयावर आधारित आहे. खंडाचा पहिला आणि दुसरा भाग याच विषयावर प्रकाशित झाला आहे. या विषयालाच अनुसरून तिसरा आणि चौथा भाग तयार केला आहे. पहिल्या खंडाचे चारही भाग याच विषयावर आधारित असून, आता कुमारकोशाचा पहिला खंड पूर्णत्वास येणार आहे.

हे ही वाचा : 

पावसाळ्यात कशी घ्यावी घराची काळजी, जाणून घ्या अधिक

शेड टाकून पावसाळ्यातही होणार मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रिटीकरण

The post कुमार कोशाची लवकरच अद्ययावत ई-आवृत्ती appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow