मनोज जरांगे पाटील यांचे विशेष अभिनंदन! सुरेश पाटील

प्रतिनिधी २७ जानेवारी
गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्यात नवप्रकाश आणणारा मराठ्यांचा क्रांतिसूर्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी समाजाच्या हितासाठी उभारलेला ऐतिहासिक जिद्दीचा लढा यशस्वी झाला. विस्तापित व गरीब मराठा एकजुटीमुळे पिढ्यानपिढ्या प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गे लागला. महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले होते की, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही! आज त्यांनी समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मराठा समाज शतकानुशतके स्मरणात ठेवेल.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. तर आज मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आपलं उपोषण सोडले. जरांगे पाटील यांची लवकरच विजयी सभा होणार असून त्यापद्धतीने नियोजनासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे.
मराठा आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या सर्व विर समाज बांधवांना विनम्र अभिवादन करतो आणि मराठा समाज आपला सदैव ऋणी राहील. याबरोबरच या लढ्यात सक्रिय असणाऱ्या सर्व समाज बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
What's Your Reaction?






