शिरूर तालुक्यात भीमराव धोंडे यांच्या प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरुर कासार प्रतिनिधी: आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी शिरूर शहरात काढलेल्या प्रचार फेरीस शिरुरकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. शिरूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भीमराव धोंडे यांच्या हस्ते झाले. तसेच ठिकठिकाणी तोफा वाजवुन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जि. प. सदस्य रामराव खेडकर, मधुकर ढाकणे,रामदास बडे, सरपंच ज्ञानदेव केदार,महारुद्र खेडकर, सरपंच भागवत ढाकणे, किशोर खोले, युवराज सोनवणे, इंजि. बडे,भगवान ढाकणे, शामभाऊ महारनवर, प्रकाश बडे, मधुकर जायभाय, अशोकराव सव्वाशे, दत्तु जायभाय,डोंगर पाटील, अभिलाष गाडेकर व इतर उपस्थित होते. प्रारंभी शिरूर शहरात प्रचार फेरी काढण्यात आली. जागृत देवस्थान कालिका मंदिर, सिद्धेश्वर देवस्थान येथे दर्शन घेतले. अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मतदार संघात मतदार संघातील शिरूर तालुक्यात दौरा केला. संपूर्ण शिरूर तालुक्यात शिट्टीचाच आवाज आहे असे सर्वसामान्य मतदारातून बोलले जात आहे. यावेळी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मी वीस वर्षे विधानसभा सदस्य असताना प्रचंड प्रमाणात विकास कामे केली आहेत. मी कधीही जात पात मानली नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासकामे केली आहेत. मतदारांनी आपापसातील मतभेद विसरून माझ्यासाठी काम करा तसेच माझे निवडणुक चिन्ह शिट्टी आहे. २० तारखेला शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन भीमराव धोंडे यांनी केले. याप्रसंगी विविध ठिकाणी जि प सदस्य रामदास बडे, रामराव खेडकर, मधुकर ढाकणे व इतरांची भाषणे झाली. बावी येथे झालेल्या कार्यक्रमात विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार देविदास जायभाय यांनी माजी आमदार धोंडे यांना जाहीर पाठिंबा दिला व शिट्टी या चिन्हांचा मतदान करण्याचे आवाहन जायभाय यांनी केले.
What's Your Reaction?






