आगाम भागवत यांना स्टार एज्युकेशन अवार्ड जाहीर

बीड प्रतिनिधी:- श्री.आगाम भागवत रावसाहेब यांना 2023 चा स्टार एज्युकेशन अवॉर्ड जाहिर झाला असून एस.एफ.ई. कोलॅबोरेशन विथ एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र चा बेस्ट प्रिन्सिपॉल इन बीड हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचावर जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे दि - 4 डिसेंबर 2023 रोजी पार पडणार आहे.पुरस्कार हा पैशाने विकत घेता येत नाही तर तो मिळवण्यासाठी व्यक्तीमध्ये असावी लागते ती गुणवत्ता आणि याच गुणवत्तेच्या आधारावर पुरस्कार दिला जातो.
ह्या पुरस्कारासाठी पात्रता पूर्ण केली ती *सोमेश्वर पब्लिक स्कूलचे कर्तृत्ववान, सर्वगुणसंपन्न असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य भागवत आगाम सर प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आणि ज्ञानाची योग्य मांडणी व नियोजन यामधून मिळते ती गुणवत्ता आणि गुणवत्ता टिकून ठेवून मिळवता येते यश याच सुत्राचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी बनविण्याचे महत्त्वपुर्ण कार्य प्राचार्य आगाम सर यांनी केले.आणि त्यानी केलेल्या प्रामाणिक कार्याला यश देखील आले आहे.
त्यांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण कार्याचे कौतुक हे समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे. आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे गुणवत्तापूर्ण कार्याचा गुण गौरव म्हणून भागवत आगाम सर यांना सर्वोत्तम प्राचार्य पदाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल 2023 चा स्टार एज्युकेशन अवार्ड देऊन गौरविण्यात येत आहे. हा अवार्ड मिळणं म्हणजे सोमेश्वर पब्लिक स्कूल चे मोठे यश आहे.आणि बीडच्या स्कूलमध्ये सर्वोत्तम प्राचार्य हा मान आगाम सर यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे.हे खर्या अर्थाने सिध्द झाले आहे.
What's Your Reaction?






