तहसील मधील भ्रष्टाचार थांबवा भाई नारायण गोले
माजलगाव प्रतिनिधी:- तहसील कार्यालयात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून तहसील कार्यालयातील कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी हे नागरिकाची प्रचंड प्रमाणात लूट करत असून मा. न्यायालयाच्या वारस प्रमाणपत्र आधारे फेरफार नोंदवण्यासाठी गंगामसला महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी श्री आप्पासाहेब सानप हे प्रति फेर 5000 रुपयाची मागणी शेतकऱ्यांना करत आहेत, शिवाय पैसे न देणाऱ्याशेतकऱ्यांनी दिलेल्या वारस प्रमाणपत्रा आधारे तलाठी यांनी नोंदवलेला फेर नामंजूर करत आहेत याबाबत शुक्ल तीर्थ लिमगाव येथील शेतकरी लक्ष्मण आप्पा चव्हाण या शेतकऱ्याने मंडळ अधिकारी श्री सानप यांच्याशी संपर्क केला असता मंडळ अधिकारी सानप यांनी न्यायालयाच्या प्रमाणपत्रा आधारे तलाठी यांनी टाकलेला फेर असला तरी मला काही देणे घेणे नाही असे सांगून जोपर्यंत मला पैसे देत नाही तोपर्यंत फेर ना मंजूरच करत राहणार असे सांगून शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली तसेच तहसील कार्यालयातील राशन कार्ड काढण्यासाठी नागरिकाकडून प्रत्येकी पाचशे ते हजार रुपये बळजबरीने वसूल केले जात असून पुरवठा विभागात देखील प्रचंड प्रमाणात राशन धारकासह नागरिकांची लूट केली जात आहे याबाबत तहसीलदार यांना कार्यवाही करण्याची वारंवार विनंती करून देखील तहसीलदार यांनी आज पर्यंत तहसील कार्यालयातील कर्मचारी मंडळ अधिकारी यांच्यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही शिवाय तहसील कार्यालयात भ्रष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांना पैसे घेण्यासाठी अडचण होऊ नये या कारणामुळे कार्यालयात सीसीटीव्ही न लावता तहसीलच्या आवारात सीसीटीव्ही लावून भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी यांना संरक्षण देण्यासाठी कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही फुटेज लावलेत काय असा सवाल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी केला असून तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तात्काळ बंद करून कार्यालयात लावण्यात यावेत तसेच भ्रष्ट मंडळाधिकारी सानप व संबंधित भ्रष्ट कर्मचारी यांच्या मार्फत चालू असलेला भ्रष्टाचार थांबवून तात्काळ संबंधितावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्यासह भाई मुंजा पांचाळ, भाई अभिजीत आठवे, जयराम कोरडे, मोजम कुरेशी, आखिल कुरेशी, त्रिंबक धिरडे, जनार्दन कुदळे, सोनाजी जाधव, श्रीराम शेवाळे आदींनी दिला आहे..
What's Your Reaction?