अतिक्रमण विरोधातील कारवाई थांबवा !भाजपा

लोकभावना लक्षात घेऊन अतिक्रम विरोधातील कारवाई थांबवा! अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे.
बीडसह जिल्हाभरात शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवणे बाबत जिल्हा प्रशासनाकडून कारवाई चालू आहे. या कारवाईमुळे हजारो कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येणार आहे. शासनाचा हा निर्णय सामान्य जनतेसाठी अन्याय कारक असून, लोकभावना लक्षात घेऊन या निर्णयाचा फेर विचार करावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रम विरोधातील कारवाई थांबवून जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी करणारे निवेदन देऊन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सतोंष राऊत बीड यांची भेट घेऊन केली.
या शिष्टमंडळात अँड सर्जेराव तांदळे, प्रा.देविदास नागरगोजे, डॉ लक्ष्मण जाधव,अजय सवाई,अनिल चांदणे, शांतीनाथ डोरले , बालाजी पवार आदि उपस्थित होते.
सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप
Files
What's Your Reaction?






