अंगावर वीज पडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू

बीड प्रतिनिधी:- पाथरवाला बुद्रुक येथे अंगावर विज पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची, दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात सर्वत्र ढगाळलेले वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही भागात विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. अशाच परिस्थितीत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे बनगर वस्ती शिवारात, श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे हा सोळा वर्षीय विद्यार्थी, उसाच्या शेताला पाणी देत असताना, वीज अंगावर पडून सदरील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






