बीडच्या आरटीओ कार्यालयात बोगस चारित्र्य प्रमाणपत्र सादर, दोघांवर गुन्हा
आरटीओ कार्यालय बीड येथे बनावट चारित्र्य प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणात, एका एजंटसह अर्जदारावर फसवणुकीचा गुन्हा, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या आरटीओ कार्यालयामध्ये शेख इकबाल शेख खुर्शीद ,याच्या ऑटो रिक्षा परवान्यासाठी इरफान खान या एजंटच्या मार्फत शासकीय फीस 500 रुपये भरून चारित्र्य प्रमाणपत्र सादर केले. त्या चारित्र्य प्रमाणपत्रावर फोटो नसल्याने परिवहन अधिकाऱ्याला तात्काळ संशय आला त्यानंतर अधिकारी स्वप्निल माने यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालयाला पत्र पाठवून माहिती मागवली, तेव्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून धक्कादायक माहिती समोर आली. त्यामध्ये हे प्रमाणपत्र प्रदिप अंकुश वडमारे रा. प्रकाश अंबेडकर नगर बीड या मूळ अर्जदारास दि. 12 डिसेंबर 2022 मध्येच डिजिटल स्वरूपात दिल्याचे लेखी कळवले. यामधून शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले .या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र विठ्ठलराव साबणे यांच्या फिर्यादीवरून शेख इकबाल शेख खुर्शीद आणि एजंट इरफान खान या दोघांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?