आरक्षणवादी समूहांचे हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी वंचित ची सभा यशस्वी करा !खाडे

पाटोदा,शिरुर (का) येथील"लढा वंचितांच्या सत्तेचा " सभेच्या पूर्व नियोजन बैठकीत जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांचे प्रतिपादन.
(बीड प्रतिनिधी) प्रस्थापित राजकीय पक्ष व मोगलाई मराठा नेत्यांनी सातत्याने मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण,यांसारख्या आरक्षणावादी समूहांना आरक्षण मिळवून देण्याचे खोटी आश्वासने वेळोवेळी दिली.तसेच जाहीर सभांमधून कुलदैवतांच्या खोट्या शपथा घेऊन फक्त त्यांची मते घेऊन सत्ता मिळवण्यासाठी वापर केला. परंतु या समूहांच्या हक्क व अधिकारांसाठी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने न्यायालयीन व रस्त्यावरील महामोर्चे आंदोलनांची लढाई लढत आहेत असे प्रतिपादन शिरूर (का),पाटोदा येथील लढा वंचितांच्या सत्तेच्या या महासभेच्या पूर्व बैठकी मध्ये जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांनी केले.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, तक्रार निवारण समितीचे राज्य अध्यक्ष विष्णू जाधव युवा आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा निरीक्षक अमोल लांडगे यांनी ११ऑक्टोबर रोजी येथील छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण( मल्टीपर्पज) येथे दुपारी ४:०० वाजता होणाऱ्या महासभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करून सभा यशस्वीतेसाठी उपस्थित यांना यथोचित मार्गदर्शन केले.
या बैठकास जिल्हा कोर कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू (दादा) गायकवाड, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर ,सहसचिव पुरुषोत्तम वीर, गोरख झेंड, जिल्हा सदस्य सोनाजीराव सोनवणे,जिल्हा प्रसिद्ध प्रमुख डॉ.गणेश खेमाडे,बालाजी जगतकर, तालुकाध्यक्ष किरण वाघमारे उपाध्यक्ष गणेश वीर शहराध्यक्ष लखन काका जोगदंड, युवा नेते अजय सरवदे, शिरूर तालुका अध्यक्ष दिलीप माने, पाटोदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड विचार मंचावर उपस्थित होते.
या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे शिरूर,पाटोदा तालुका कार्यकारणी सह पंचक्रोशीतील वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






