सुरेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बीड (प्रतिनिधी)
बीड शहराजवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या वासनवाडी गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ सुधामती शिंदे यांची अनेक दिवसानंतर बिनविरोध निवड करण्यात आली. शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्यांचे पदाधिकारी तथा समाजसेवक सुरेश पाटील यांनी वासनवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये विशेष लक्ष घालून शासनाचे लक्ष वेधून पाठपुरावा केला होता. अनेक दिवसाच्या प्रतिक्षानंतर आज विशेष सभा बोलून वासनवाडी ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जमाती (ST) च्या सुदांमती शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नऊ सदस्य असलेल्या वासनवाडी ग्रामपंचायत सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते. सुदामती शिंदे हया एकमेव सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु सरपंच निवडीच्या वेळी त्या अनुपस्थित राहिल्याने त्यांची सरपंच पदी निवड होऊ शकली नाही. तब्बल चार महिन्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केल्याने त्याची दखल समाजसेवक सुरेश पाटील यांनी घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विशेष सभा बोलून त्यांची सरपंच पदी निवड करावी. अशी विनंती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना केली होती. लागलीच आदेश देवून दिनांक २२ मार्च रोजी विशेष सभा घेवून निवड प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश देण्यात आले. आज वासनवाडी ग्रामपंचायतमध्ये सौ. सुदामती शिंदे यांची सरपंच पदाची निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी सात सदस्यांनी त्यांच्या निवडीस पाठिंबा देवून सरपंच पदाची माळ सुदामती शिंदे यांच्या गळ्यात टाकून बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन सानप, तलाठी सुनील कुलकर्णी, ग्रामपंचायतचे सचिव रवींद्र घोडके, उपसरपंच अंकुशराव खोड, सदस्य गणेश खोड, राजाभाऊ बंगाळ, शितल घोलप, अशोक दळवी, कोनताबाई घोलप, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील, धाडस संघटनेचे प्रशांत आव्हाड, सतिष राऊत, पत्रकार टाकनखार, आदीं गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






