ऊसतोड कामगारांना कामगारांचा दर्जा देण्यात यावा डॉ. संजय तांदळे
पुणे नजीक मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधीच्या बैठकीत येत्या तीन महिन्याच्या आत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करून त्याद्वारे ऊसतोड कामगाराचे प्रश्न सोडविण्यात येतील असे खा .शरद पवार यांनी जाहीर केले होते.परंतु या घटनेला जवळपास तीन वर्ष होत आले असून ऊसतोड कामगारांच्या मागण्याबाबत अद्याप पर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला दिसून येत नाही .चालू हंगामात दहा रुपये प्रति टनाप्रमाणे साखर कारखान्या कडून 38 कोटी तर महाराष्ट्र शासनाकडून 38 कोटी रुपये असे एकूण 76 कोटी रुपये साखर आयुक्त कार्यालयात जमा असल्याची समजते.तो पैसा समाज कल्याण अंतर्गत असलेल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे वर्ग करण्यात यावा.तसेच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाच्या अध्यक्षाची निवड त्वरित करण्यात यावी . येत्या शैक्षणिक वर्षात तरी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात यावी, ज्या कारखान्यावर ऊसतोड कामगार ऊस तोडणी साठी जातात त्याच कारखान्यावर ऊसतोड कामगाराची नोंदणी करण्यात यावी व त्यांना कारखान्याकडून ओळखपत्र देण्यात यावे व ऊसतोड कामगारांची शंभर टक्के नोंदणी करण्यात यावी, त्यांना कामगाराचा दर्जा देण्यात यावा, ऊस तोडणी साठी प्रति टन पाचशे रुपये मजुरी देण्यात यावी, ऊसतोड मजुरांचा विमा उतरण्यात यावा ,ऊस तोडणी दरम्यान अपघातात मृत्यू पावलेल्या कामगारांना त्वरित पाच लाखाची मदत देण्यात यावी, कामगारांना कारखाना स्थळी राहण्याची व आरोग्याची सुविधा मिळावी आदी मागण्यांचे निवेदन 17 ऑगस्ट 2023 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा ,केंद्रीय श्रम व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्र राज्य वाहतूक मुकादम कामगार युनियनच्या वतीने महाराष्ट्र राज्य ऊसतोड वाहतूक मुकादम कामगार युनियनचे राज्य उपाध्यक्ष डॉ संजय तांदळे, राज्य संघटक तथा बीड जिल्हाध्यक्ष पांडुरंग आंधळे, ऊसतोड कामगार कृती समितीचे तसेच सी एस ए आय डी चे अध्यक्ष ओम प्रकाश गिरी, सुदाम कोळेकर आदींनी केली आहे .तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष खा.शरद पवार हे दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी बीड येथे सभेसाठी संबोधित करण्यासाठीआले असता, त्यांना समक्ष भेटून ऊसतोड कामगारा च्या मागण्याचे निवेदन देण्यात आले .
What's Your Reaction?