आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे सर्वेक्षण करा! जिल्हाधिकारी
आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचे तलाठी ग्रामसेवक तसेच अंगणवाडी मार्फत सर्वेक्षण करण्यात यावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी केले.
बीड जिल्हयातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्याने ग्रासलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे / अशा शेतक-याच्या कुटुंबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांना शासकीय योजनांचा प्रधान्याने लाभ देणे अत्यावश्यक आहे. त्यानुषंगाने शेतक-यांची आर्थिक, सामाजिक व कौटुंबीक सुरक्षितेबाबतची पाहणी करुन कुटुंबाच्या सदयस्थितीचा आढावा घेवुन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा एक भाग म्हणून शेतक-याच्या घरी प्रत्यक्ष भेट देवून कुटुंबीयांशी चर्चा करुन त्यांच्या सदयस्थितीबाबतची माहिती घेण्यासाठी बीड जिल्हातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक तसेच शिक्षक ( संमतीने) यांचे माध्यमातून शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरु आहे.
बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपण तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक यांचेमार्फतच शेतकरी सर्वेक्षणचा पाहणी विवरणपत्र ऑफलाईन / अॅपनवारे निःशुल्क भरणा करुन घ्यावे. त्यामुळे शेतकन्यांनी कोणत्याही खाजगी व्यक्ती किंवा खाजगी इंटरनेट कॅफेबर शेतकरी सर्वेक्षणाचे विवरणपत्र पैसे देवून भरुन घेवू नये असे श्री. संतोष राऊत, , निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी अवाहन केले आहे...
What's Your Reaction?