स्वप्निल वरपे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

बीड प्रतिनिधी :-युवा नेते स्वप्नील वरपे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील ढेकानमोहा या ठिकाणी असलेल्या पसायदान सेवा प्रकल्प या ठिकाणी असलेल्या अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले.
आज जर आपण पाहिले तर अनेक लोक आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे बॅनर लावतात किंवा डीजे लावतात किंवा आणखीन काही तरी करतात पण असं काहीही न करता आपल्या वाढदिवसानिमित्त स्वप्निल वरपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काहीतरी समाजकार्य आपल्या हातून व्हावं म्हणून बीड जिल्ह्यातील ढेकानमोहा या ठिकाणी असलेल्या पसायदान सेवा प्रकल्प या ठिकाणी असलेल्या अनाथ मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला व तेथील अनाथ मुलांना अन्नदान केले. आपल्या मनात असलेले लोका बदल चे प्रेम व आधर या प्रकृतितून त्यानी दाखवले.
What's Your Reaction?






