असे जपा बाळाच्या नाजूक त्वचेला
असे जपा बाळाच्या नाजूक त्वचेला
पालकत्व अनेक जबाबदाऱ्या घेऊन येतं आणि याचंच भान ठेऊन बाळाच्या प्रत्येक गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे. आज जाणून घेऊ काही बाळाच्या त्वचेच्या आरोग्यासाठी टिप्स:
मुलांची त्वचा मोठ्यांच्या तुलनेत 3 पटींनी अधिक सेंसीटिव्ह आणि कोमल असते. यामुळे त्यांच्या स्किनची देखभाल करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
विशेष करून प्रॉडक्ट्सची निवड करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असते.
स्पॉन्ज बाथ जास्त द्यावा जर मुल फारच लहान असेल तर आठवड्यातून 3 वेळेस केवळ स्पॉन्ज बाथ द्यावे आणि 4 वेळेस नॉर्मल आंघोळ घालावी.
स्पॉन्ज बाथ देण्यासाठी एका स्पॉन्जला किंवा अतिशय मुलायम कपड्याला कोमट पाण्यात भिजवा. नंतर अत्यंत हलक्या हाताने बाळाचे पुर्ण शरीर पुसून घ्यावे.
बाळाला हात लावताना देखील हात स्वच्छ आहेत याची खात्री केलेली असावी. आपल्या हातातून जंतू बाळाच्या शरीराकडे जाऊ शकतात.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.
What's Your Reaction?