आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्या! मनोज जरांगे

जालना प्रतिनिधी : छत्रपती संभाजीराजेंचा मान ठेऊन पाणी घेतलं, यापुढे अन्न आणि पाणी घेणार नाही, राज्य सरकारने मराठा आंदोलनाचा विषय गांभीर्याने घ्यावा अन्यथा त्यांना झेपणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आम्ही पहिल्यापासूनच ओबीसीमध्ये आहोत, पहिला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या अशी मागणीही त्यांनी केली. शिंदे-फडणवीस जर दिल्लीला आरक्षणाची चर्चा करायला गेले असतील तर तर त्याचा आनंदच आहे. त्यांनी दिल्लीवरून आरक्षण आणावं असंही जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या विषयावर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, मी सर्वांना ताळ्यावर आणणारआम्हा पहिल्यापासूनच ओबीसा आरक्षणात आहोत. पंजाबराव देशमुखांनी मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं सांगितलं होतं. आम्हाला सरकारने 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण दिलं पाहिजे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही. त्यामुळे पहिला आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावं आणि मग काय तो कोटा वाढवावा. छत्रपतींच्या गादीला आम्ही मानतो, राजगादीचा मान म्हणून पाणी प्यायलाो. आता यापुढे पाणीच नाही तर अन्न आणि उपचारही घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
What's Your Reaction?






