टँकर दुचाकीचा अपघात दोन जण ठार

टँकर दुचाकीचा अपघात दोन जण ठार

बीड प्रतिनिधी:- बीड हून नगरकडे जाणाऱ्या डीझेल टँकर आणि दुचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना बीड नगर महामार्गावर आष्टी तालुक्यातील डोईठाण जवळील शिवनेरी चौकात घडली.

 पाटोदा तालुक्यातील सकुंडवाडी येथील महादेव गायकवाड हे कडा येथून काम आवरून धामणगाव मार्गे गावाकडे जात असताना धामणगाव येथे डोईठाण येथील अनिल विठ्ठल तरटे वय 19 या युवकाने लिफ्ट मागितली. गायकवाड याने लिफ्ट दिली, दोघेही दुचाकीवरून जात असताना सायंकाळी चारच्या दरम्यान जात असताना बीड येथे डिझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने जात असलेला टँकर क्रमांक एम एच सोळा सी सी 76 31 याची जोरात धडक दुचाकीला बसल्याने झालेल्या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.धडकून पळून जात असलेल्या या टँकर चालकाला कडा चौकीच्या पोलिसांनी टँकर चालकाला टँकर सह ताब्यात घेतले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow