टेम्पो दुचाकीचा भीषण अपघात एक ठार
बीड: पिंपळनेर नाथापूर रस्त्यावर विटा घेऊन जाणारा टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये एक जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.सदर घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड तालुक्यातील पिंपळनेर नाथापूर रोडवर विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाने दुचाकी स्वराला जोराची धडक दिली. यामध्ये तो गंभीरित्या जखमी झाला मात्र त्याला रूग्णालयात दाखल करेपर्यंत दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील उमरद येथील तरूण गोविंद श्रीकृष्ण घोलप (वय 25) असे मयताचे नाव आहे हा सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जवळ्याकडून उमरीकडे (क्र.एम.एच.23-एम-1881) वरून जात असताना बीडकडून विटांचा टेम्पो (एम.एच.25-पी-0944) या टेम्पोने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी ओढून रस्त्याच्या बाजूल पडली यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेने सर्वत्र व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?