महामार्गावर एसटी महामंडळाच्या शयनयान बसचा भीषण अपघात
बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील लिंबागणेश महामार्गावर आज पहाटेच्या दरम्यान दि.०८ रविवार रोजी साडे ५ वाजता पुणे ते नांदेड शयनगाडी वाहन क्रमांक एम.एच.१४- ०७४२ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी लिंबागणेश याठिकाणी महामार्गावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस शेतात जाऊन खाली उतरली. यामध्ये काही प्रवासी जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ राष्ट्रीय महामार्ग व पाटोदा ग्रामीण रुग्णालयातील रूग्णवाहिका द्वारे बीड जिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले.
पुणे ते नांदेड शयनयान गाडीचा लिंबागणेश बसस्थानक याठिकाणी अपघात झाला.गाडी रस्त्यावरुन सचिन वाणी यांच्या टोमॅटोच्या शेतात गाडी उतरली.गाडीमध्ये २५ प्रवासी प्रवास करत होते.अपघातात अनिता विक्रम थोरात वय ४० वर्षे रा.खडकीघाट यांच्या कमरेच्या मणक्याला मार लागला आहे,विक्रम यदा थोरात वय ५० वर्षे ५० यांना व राधाकिसन श्रीहरी कदम वय ४५ वर्षे यांना डोक्याला मार लागला आहे.रघुनाथ कोंडीबा थोरात वय ५० वर्षं याचे डाव्या हाताचे बोट तुटले असुन शिवशाला महादेव रासकर वय ६० वर्षे रा.भारज यांना पायाला मार लागला असुन त्यांना रूग्णवाहिकेतुन बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.यावेळी लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव, विक्रांत वाणी, रोहित तागड,बबलु आबदार,शहादेव ढास व डॉ.गणेश ढवळे यांनी सहकार्य केले. वाहनचालक एम.आर.गावडे यांना डुलकी लागल्याने बस वरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. डॉ.गणेश ढवळे यांनी नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि.विलास हजारे यांना फोनवरून माहिती दिली आहे.
What's Your Reaction?