शहरात अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह

शहरात अज्ञात व्यक्तीचा आढळला मृतदेह

गेवराई प्रतिनिधी:-  गेवराई शहरांमध्ये आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मात्र सदर व्यक्तीची ओळख पटवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरामध्ये खंडोबा मंदिर परिसरात ,आज रविवारी सकाळच्या दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यावेळी नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. यावेळी तात्काळ नागरिकांनी याची माहिती गेवराई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर , तात्काळ घटनास्थळी गेवराई पोलीस दाखल झाले. सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला. व सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला. मात्र सदरील मृतदेह कोणाचा आहे ? हे अद्याप समजू शकले नाही! मात्र ओळख पटवण्याचे गेवराई पोलिसांनी आवाहन केले आहे. सत्रील मृतदेह पाहून सदर व्यक्ती 40 ते 45 वर्षाची असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.मात्र या संदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow