महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख ठरली

पुणे प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा पार पडणार आहे यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केसरी स्पर्धेला उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिली. यंदाच्या केसरी स्पर्धेत 47 संघातील 900 हून अधिक मल्ल होणार सहभागी होणार आहेत.
66 वी केसरी कुस्ती स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी सांगितले की, 47 संघातील 900 हून अधिक मल्ल सहभागी होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्पर्धेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. 1 ते 7 नोव्हेंबर ही केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तसाच वेळ मागितला असल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली. तारीख अजून मिळाली नसल्याने कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांना कळवले नसल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
What's Your Reaction?






