शौकत आराखानम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
बीड प्रतिनिधी :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त प्राथमिक शाळेत शौकत आराखानम हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
दि १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी शाळेचे ध्वजारोहण शाळेतील शिक्षीका शौकत आराखानम युसूफ जई यांच्या हस्ते करण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाडा मुक्तीसंग्रामातील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापक रजियोद्दीन ईनामदार यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
What's Your Reaction?