घरी आलेल्या पाहुणे गावी जाणायचे नावच घेत नव्हते, तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न!

घरी आलेल्या पाहुण्यांचा मुक्काम वाढल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

घरी आलेल्या पाहुणे गावी जाणायचे नावच घेत नव्हते, तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न!

घरात आलेल्या पाहुण्यांनी अनेक दिवस घरात मुक्काम केला. ते घरातून निघायचं नाव घेत नव्हते, त्यांना कंटाळून तरुणानं गळफास लावून आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तरुणाला सध्या रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला.

खरगोन जिल्ह्यातील मेला ग्राऊंड परिसरात राहणाऱ्या पंडित राजेंद्र योगीनं झाडावर चढून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण जवळपास एक ते दोन तास नाट्य सुरू होतं. काहींनी पोलिसांशी कॉल केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तरीही तो मात्र ऐकायला तयार नव्हता. त्यानं गळफास लावून घेतला. मात्र सुदैवानं पोलिसांनी त्याला खाली उतरवलं. 

त्याला रुग्णालयात दाखल केलं. तरीही योगी जीव देण्याची भाषा करत आहे. पोलिसांनी योगीची चौकशी केली. कौटुंबिक वादातून त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं त्यातून उघडकीस आलं. योगीच्या घरात दोन महिन्यांपूर्वी त्याचा साडू राहण्यास आला. पाहुणा म्हणून आलेल्या साडूनं योगीच्या घरात मुक्काम ठोकला. तो माघारी जाण्याचं नावच काढत नव्हता. त्यामुळे योगीनंच त्याला निघण्यास सांगितलं. त्यावर साडूनं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे वैतागलेल्या योगीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणानं झाडावर चढून गोंधळ घातल्याची माहिती मिळाल्यानं घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी तरुण कडुलिंबाच्या झाडावर चढून गळफास लावण्याचा प्रयत्न करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं ऐकलं नाही. अखेर चारचाकीवर चढून पोलिसांनी त्याला खाली उतरवलं आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, अशी माहिती पोलीस अधिकारी बी. एल. मंडलोई यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow