घरावर दरोडेखोरांनी टाकला दरोडा ,ऐवज लंपास दोघे गंभीर जखमी

धारूर/ बीड :- धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घरावर दरोडा पडला असून, दोन लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे यामध्ये दोघांना गंभीरित्या जखमी केले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गावंदरा येथे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सुदाम बडे रा. गावंदरा तालुका धारूर जिल्हा बीड यांच्या घरी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान दरोडेखोरांनी पाळत ठेवून घरात प्रवेश केला. आपल्या घरात कुणीतरी शिरलय, याची भनक बड़े यांना लागल्यानंतर ते जागे झाले. घरातील कपाटामधील सोन्याचे दागिने काढून घेत असल्याचे बडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चोरट्यांना दागिने घेऊन जाण्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडाने त्यांच्यावर मारा करत त्यांना गंभीरित्या जखमी केले. बडे हे जखमी झाल्यानंतरत्यांनी आरडाओरडा केला असता चोरटे घटनास्थळाहून पसार झाले. त्यांच्या घरातील एक सोन्याचे नेकलेस आणि एक अंगठी असा दोन लाखांचा ऐव लंपास केला. या घटनेत सुदाम बडे यांच्यावर हल्ला केल्याने त्यांना बीडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचा पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?






