चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून

बीड प्रतिनिधी:- चारित्र्याच्या संशयातून धावड्याची वाडी येथे एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी तात्काळ घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला.
बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धावड्याचीवाडी येथे पत्नी मंगल गुंडीराम भोसले वय 45 वर्ष हिच्यावर तिचे पती गुंडीराम भोसले यांनी चारित्र्याचा संशय घेऊन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती तात्काळ नागरिकांनी नेकनूर पोलिसांना दिली. यावेळी तात्काळ घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. व सदर घटनेचा पंचनामा केला. अगोदर त्यांचे पैशाच्या कारणावरून वाद व्हायचे त्यानंतर चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला होता आणि नंतर असा धक्कादायक प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पती गुंडीराम याला पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत
What's Your Reaction?






