वृद्ध महिलेचे मनी मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
बीड प्रतिनिधी :- बीड शहरातील यादव मळा सावता माळी चौकातील वृध्द माहिलेचा गळयातील मंणीमंगळसुत्राची जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखा बीडने मूसक्या आवळून जेरबंद केले.
दिनांक 16/10/2023 रोजी दुपारी 13.00 वा. चे सुमारास फिर्यादी वच्छलाबाई लक्ष्मण वाघ वय 65 वर्षे व्यवसाय घरकाम रा. यादवाचा मळा सावता माळी चौक बीड हया एकटया घरासमोर बसलेल्या असताना एका अनोळखी इसमाने त्यांचे जवळ येऊन त्यांचे गळयातील एक सोन्याचे मणीमंगळसुत्र बळजबरीने हिसकावुन नेले आहे वगैरे मजकुराचे फिर्यादवरून पो.स्टे. बीड शहर गुरनं 239/2023 क.392 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदरची बाब गंभीरतेने घेवून मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी वरील घटनेतील आरोपींना तात्काळ जेरबंद करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. सदर गुन्हयाचे अनुषंगाने पो. नि. स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथकाने
घटनास्थळी भेट देवून आरोपी व गेलेमालाचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा शेख खलील शेख एजाज रा.लेबर कॉलनी होळकर नगर लातुर याने केलेला आहे खात्रीशीर माहिती मिळाले वरुन दिनांक 30/11/2023 रोजी माजलगाव येथुन ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी नामे शेख खलील शेख एजाज वय-28 वर्ष रा. लेबर कॉलनी होळकर नगर लातुर यास पो.स्टे. बीड शहर गुरनं 239/2023 कलम 392 भादंवि चे तपासकामी पो.स्टे. बीड शहर यांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास पो.स्टे. बीड शहर व स्था.गु.शा. चे पथक करीत आहे. आरोपीतांकडुन अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी मा.श्री नंदकुमार ठाकुर पोलीस अधिक्षक बीड मा.श्री सचिन पांडकर अपर पोलीस अधिक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरिक्षक संतोष साबळे पो.उपनि श्रीराम खटावकर, पोह मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना-सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे, पोकों सचिन आंधळे, अलिम शेख, विकी सुरवसे, अशोक कदम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.
What's Your Reaction?