अत्याचार प्रकरणातील एका आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

धावत्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपींपैकी एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केले असून त्याच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केले. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एका महिलेवर धावत्या गाडीमध्ये अत्याचार केल्याची घटना घडली होती. मात्र याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर, तात्काळ शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्री गतिमान केली. यानंतर त्यांनी अमोल नामदेव लंबाटे वय 34, रा. सात्रापोत्रा असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. रात्री पिंक पथकप्रमुख एपीआय अंतरप यांनी सात्रापोत्रा येथे जाऊन सापळा रचून सबंधित आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आणि त्याला जेरबंद केले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले मात्र अद्यापही या प्रकरणातील दोघे फरार असल्याचेही सांगण्यात आले .याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?






