अटल दरोडेखोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या! पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेतून माहिती
बीड प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अटल दरोडेखोरांच्या पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनात, पोलिसांनी मूसक्या आवळून त्यांना जेरबंद केले. अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून दिली आहे.
गेली अनेक दिवसापासून राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या शोधात पोलीस होते. बीडसह अहमदनगर, पुणे, सोलापुर, औरंगाबाद. कोल्हापूर, सातारा अशा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात चोरी, घरफोडी, खुनासह दरोडा, यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी पोलिसांना अनेक वर्षांपासून गुंगारा देत होते. तसेच वेगवेगळ्या भागात दहशत निर्माण करत होते. मात्र पोलीस त्यांच्या शोधातच होते.आष्टी पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर आटल्या उर्फ अटक उर्फ अतुल उर्फ योगेश ईश्वर भोसले याच्यासह होम्या उर्फ हेमराज उध्दव काळेआणि धोंड्या उर्फ धोंडीराम ईश्वर भोसले या तिघांच्या मुसक्या आवळल्या तर संदिप इश्या भोसले, शाम्या नवनाथ काळे हे दोघेजण फरार झाले. सदर कारवाई आष्टी पोलिस, एलसीबी आणि आरसीपी प्लाटुन यांनी संयुक्तरित्या काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील शिराळा शिवारात सदर कारवाई केली. आहे अशी माहिती बीड जिल्ह्याची पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती दिली. यावेळी अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?