महानिर्मितीमधील पद भरती चा पेपर फुटला
मुंबई प्रतिनिधी : राज्यात मागील काही स्पर्धा परीक्षांची पेपर फुटत असल्याचे समोर आले होते. त्यानंतरही पेपरफुटीची मालिका थांबण्याची चिन्हे नाहीत. महानिर्मितीमधील पदभरतीसाठी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा दावा करण्यात येत आहे. महानिर्मितीमधील भरती परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. पेपरफुटीच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या पेपरफुटीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. पेपर सुरू असताना प्रश्नपत्रिकाचे बटन कॅमेराने काढलेले फोटो समोर आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री असलेल्या खात्याचा पुन्हा एकदा पेपर फुटला आहे.देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत तर मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला होता. त्यांच्याकडे ऊर्जाचे खाते आहे तर आता महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटला, असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. फुटलेला पेपर आमच्याकडे आहे असेही समितीने सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पेपरफुटीचे मागे कोणते रॅकेट काम करत आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
What's Your Reaction?