शाळेला छत नाही आणि आलेल्या बजेटमध्ये दर्जेदार फरशी बसवली! आम आदमी पार्टी करणार आंदोलन
अंथरवण पिंपरी तांडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक व विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत आहेत त्या ठिकाणी शाळा दुरुस्तीसाठी आलेल्या बजेटमध्ये छत दुरुस्त न करता दर्जेदार फरशी बसवली यासाठीच त्या ठिकाणी आम आदमी पार्टीने जाऊन पाहणी केली असून आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांनी दिली आहे.
बीड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावर असणारे अंथरवण पिंपरी तांडा आहे, या गावी आज आम आदमी पार्टीच्या संवाद दौऱ्यामध्ये गेले असता, या गावांमध्ये जिल्हा परिषदेची शाळा अंगणवाडी आहे. या शाळेमध्ये पाहणी केली असता एक विशिष्ट चित्र पाहावयास मिळाले या बिल्डिंगचे वरचे छत पडलेले होते. ज्यामध्ये मुले शिकत होती. आणि शिक्षक त्यांना उत्साहाने शिकवत होते. त्या रूममध्ये पाणी टपकत असताना देखील शिक्षक आपला कर्तव्य निभवताना दिसले. विद्यार्थी कसाबसा आपला जीव मुठीत घालून शिकताना दिसले. परंतु या प्रशासनात बसलेले अधिकारी इंजिनियर यांना वर्षानं वर्ष अगोदर या शिक्षकांना लेखी पत्र देऊन देखील त्या शाळा विषयी कसल्याही प्रकारचं दुरुस्ती करताना किंवा करू वाटली नाही. एवढी उदासीनता प्रशासनाची नागरिकांविषयी का असावी हा मोठा प्रश्न आहे येथील शिक्षकांना विचारले असता एक खूप मोठी गोष्ट समोर आली. ज्या शाळेचा स्लॅप छत तुटलेला असताना त्या शाळेमध्ये फरशी बसवण्याचं बजेट येतं ते छत न दुरुस्त करता त्या वर्गामध्ये फरशी बसवली जाते. म्हणजे हा किती मोठा अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे. हे सर्व प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी शासन दरबारी मांडणार आहे. आणि यामध्ये दोषी असलेले अधिकारी इंजिनिअर यांच्यावरती कारवाई का होत नाही अशी विचारणा करणार आहे. या दौऱ्यामध्ये माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष रामभाऊजी शेरकर मीडिया प्रमुख प्रवीण पवार युवा संघटन मंत्री इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?