जावयाने रचला मेहुणीला पळवण्याचा सापळा
Stay updated with the latest breaking news in Beed, Maharashtra. Find the most recent updates on politics, events, sports, and more.
एका युकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुली ला अज्ञात कारनाची फूस लावून पाळून नेल्याची घटना राजपिप्री येथे घडली आहे. मुलीच्या आई दिलेल्या फिर्यादी वरून गेवराई पोलीस ठाण्यात जावाई नवनाथ दत्तात्रय सुरवसे व लक्ष्मण उर्फ भैय्या ज्ञानेश्वर मुळक रा. राजपिप्री ता.गेवराई यांच्या विरुद्ध ३६३ व ३४ कलमा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
सविस्तर बातमी अशी आहे की, फिर्यादी हे राहणार सावरगाव येथील असून त्यांच्या परिवात पती आणि ४ मुली एकत्र राहून मजुरी करुन कुटुंबाची उपजिविका भागवतात. सर्वात मोठी मुलगी पुजा नवनाथ सुरवसे हिचे दोन महिन्यापूर्वी माजलगाव येथे कुंटूंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्याने ती आई वडील कडे होती. तिला सोबत घेऊन जाण्यासाठी तिचा नवरा (फिर्यादी चा जावाई) नवनाथ सुरवसे हे दिनांक २४/०५/२०२३ रोजी सावरगाव येथे आले. पुजा हिला घेऊन जाताना पीडित हिस उन्हाळ्याची सुट्टी असल्याने जावाई नवनाथ सुरवसे यांनी पीडित मुलगी हिस त्यांचे सोबत त्यांचे गावी राजपिंप्री ता. गेवराई येथे घेऊन गेले. त्या नंतर दि. ३१/०५/२०२३ रोजी रात्री १० च्या सुमारास फिर्यादी ला पीडितेने फोन लावला व सांगितले दाजी माझे लग्न त्याचे भाच्या लक्ष्मण उर्फ भैय्या ज्ञानेश्वर मुळक रा. राजपिप्री यांच्या सोबत लावणार आहेत तू मला लवकर घेण्यासाठी ये त्यानंतर फिर्यादी दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० च्या सुमारास जेवायच्या घरी गेले व मुली संदर्भात विचारणा केली. त्यावेळी जावयाने मला माहिती नाही कोठे गेली की असे उत्तर दिले त्यानंतर फिर्यादी ने सर्वत्र पाहणी केली त्यानंतर मुलीच्या आई ने गेवराई पोलीस ठाण्यात पळ काढली व स्वतः फिर्याद गेवराई पोलीस ठाण्यात जावाई नवनाथ दत्तात्रय सुरवसे व लक्ष्मण उर्फ भैय्या ज्ञानेश्वर मुळक रा. राजपिप्री ता.गेवराई यांच्या विरुद्ध ३६३ व ३४ कलमा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
What's Your Reaction?