सहाव्या दिवशीही सूतगिरणी कामगारांचा संप सुरूच

सहाव्या दिवशीही सूतगिरणी कामगारांचा संप सुरूच

शहादा प्रतिनिधी दिनांक २२/०८/२०२३ पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुतगिरणीतील कामगारांनी सुरू केलेला बेमुदत संप सहाव्या दिवशीही सुरूच आहे.५ महिन्यांचा पीएफ भरणार,इंडेक्स नंबर लावणार, चालू वर्षांचा बोनस सप्टेंबर ८ ते १० तारखेला देणार,सप्टेंबर महिन्यापासून एक पगारी रजा लावणार, हजेरी प्रमाणे स्केल कायम करणार अशा ५ मागण्या पूर्ण करण्याचे तोंडी आश्वासन एमडी राजाराम पाटील यांनी आम्हाला दिले आहेत, याव्यतिरिक्त आमच्या इतरही मागण्या आहेत,जर एमडीने आम्हाला मागण्या पूर्ण करतो म्हणून फसवलं तर आम्ही पुन्हा संपावर बसू.तरीही आमचा हा संप सुरूच राहणार आहे,संपाचा निर्णय अद्याप झालेला नाही,अशी माहिती सुतगिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष जगन निकुंभ यांनी दिली.

          मी सुतगिरणीत २८ वर्षे काम करतोय,आमचा मागील वर्षांचा बोनस आम्हाला मिळावा,असे कामगार राजेंद्र पाटील म्हणाले.तर मी २५ वर्षे सुतगिरणीत कामाला आहे,आम्हाला संपाच्या दिवसांचे पगार मिळावा,असे कामगार कैलास शिरसाठ म्हणाले.एमडी राजाराम पाटील यांनी आमचे पैसे हळप केले आहेत. ते आम्हाला खोटे बोलतात, आमचा एमडीच्या बोलण्यावर विश्वास नाही,असे काही कामगार म्हणाले.तहसिलदार यांची परवानगी घेऊन २८ तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहोत.मोर्चाबाबत आमचा अर्ज शहाद्याचे तहसीलदार यांनी स्वीकारला परंतु पोलिसांनी आमचा अर्जच स्वीकारला नाही,आम्हाला सहकार्य केले नाही अशी प्रतिक्रिया युनियनच्या पदाधिका-यांनी दिली.

         अभी नही तो कभी नही,हम अपना हक मांगते नही किसीसे भिख मांगते,कामगार युनियन जिंदाबाद,हमारी मांगे पूरी करो, कोण म्हणतो देणार नाही,घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशा जोरदार घोषणा कामगारांनी दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow