कालिका देवी मंदिरात दानपेटीची चोरी

बीड प्रतिनिधी- कालिका नगर भागामध्ये कालिकादेवी मंदिरात असणारी दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. यावेळी घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.
बीड शहरातील कालिका नगर भागामध्ये कालिकादेवी मंदिर असून तेथील दानपेटी चोरट्याने चोरी केली आहे. दानपेटी चोरून घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद झाला आहे. त्या दानपेटीत अंदाजे 30 हजार रुपये पर्यंत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले.आणि सदर घटनेचा पंचनामा केला. यावेळी या चोरीच्या तपासासाठी डॉग स्कोड आणि फिंगर पथकाला पाचारण करण्यात आले. आता याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत.
What's Your Reaction?






