गेवराईमध्ये भर दिवसा चोरट्यांनी घर फोडले

गेवराई शहरांमध्ये भर दिवसा मुख्याध्यापकाचे घर फोडल्याची घटना घडली आहे. सुमारे पाच लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
शहरातील भगवाननगर भागात मुख्याध्यापक बळीराम जाधव राहतात. रविवारी ते तालुक्यातील केकेतपांगरी येथे सहकुटुंब पाहुण्याच्या येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमास सकाळी गेले होते. त्यांच्या घरावर पाळत ठेवणा-या अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत भर दुपारी त्यांच्या घराच्या गच्चीवरुन येऊन घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक देखील तोडून कपाटातील सोन्या चांदीच्या दागिण्यासह रोख रक्कम असा एकूण जवळपास ५ लाख रुपायांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. मुख्याध्यापक बळीराम जाधव यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेऊन भरदुपारी त्यांचे घर फोडून चोरी धाडस केले असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. घटनेची माहिती पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन पंचनामा केला याचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?






