वद्ध कीर्तनकाराला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी!

वद्ध कीर्तनकाराला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी!

वद्ध कीर्तनकाराला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी!

एका वयोवृध्द कीर्तनकारास धमकी देणार्‍या दोघांविरोधात छत्रपती संभाजीनगर / औरंगाबाद शहरातील वाळूज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला 30 हजार रुपये द्या किंवा तुमचे फोटो इतरांना दाखवून समाजात तुमची बदनामीकारेन, अशी धमकी कीर्तनकारास देण्यात दिली होती. सततच्या या धमकीला कंटाळून कीर्तनकाराने पोलीसात धाव घेत तक्रारकेली, यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे  

गंगापूर तालुक्यातील मांगेगाव येथील कीर्तनकार अंबादास गावंडे हे सध्या वाळूजला आपल्या कुटंबासह राहतात. तर मृदंगवादक ज्ञानेश्वर सुलाने (रा. बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्या मध्यस्थीने कीर्तनकार गावंडे अनेक ठिकाणी कीर्तनातून प्रबोधन करण्याचे काम करतात. विशेष म्हणजे सुलानेबरोबर चांगल्या प्रकारचे ओळखीचे सबंध झाल्याने सदर कीर्तनकारांनी त्याला आपल्या घरीही अनेकवेळा आणलेले होते. अशातच 13 मे रोजी सुलाने यांनी मला वृंदावनला जायचे असल्याने अंबादास महाराज यांना 30 हजारांची मागणी केली. त्यावर कीर्तनकाराने नकार देताच त्याने माझ्याजवळ असलेले तुमचे फोटो मी इतरांना दाखवून तुमची समाजात बदनामी करील अशी धमकी दिली. दरम्यान त्यानंतर मांगेगाव येथेही जाऊन अशोक गावंडे यांच्या संगतीने पुन्हा 15 मे रोजी वरील प्रकारची धमकी दिल्याचे गावंडे यांनी सदर कीर्तनकाराला कळविले. गेल्या 15 मे पासून पैसे दे अन्यथा बदनामी करील अशी सुलाने सतत धमकी देत होता. तसेच त्यांचे कोणते फोटो आहेत हे किर्तनकारालाही माहिती नाही. त्यामुळे त्रास असहय्य झाल्याने अखेर कीर्तनकार अंबादास मारुती गावंडे यांनी ज्ञानेश्वर सुलाने (रा.सासेगाव, ता. कन्नड ह. मु. बजाजनगर), अशोक बारकु गावंडे ( रा.मांगेगाव ) या दोघाच्या विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात (waluj police station sambhajinagar) गुन्हा दाखल करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow