बीड शहरातील तीन चोरट्यांच्या माजलगाव बस स्थानकात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बीड शहरातील तिघांच्या माजलगाव बस स्थानकात चोरीच्या प्रकरणात माजलगाव शहर पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
माजलगाव बस स्थानकामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या बीड शहरातील तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बीड शहरातील रहिवासी असणारे शेख जमीर उर्फ शौकत शेख जब्बार वय ३२ रा. तेलगावनाका बीड, शेख नसीर शेख बशीर वय २५ रा.गांधी नगर, बीड आणि सय्यद शहानवाज सय्यद खलील वय २८ रा. गांधी नगर बीड या तिघांना ताब्यात घेतले. तिघांकडे ब्लेड, कटर आणि 5 मोबाईल आढळुन आले. पोलीसांनी चौकशी केली असता त्यांनी माजलगाव बसस्थानकात चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याची कबूली दिल्याचे पोलीसांनी सांगितले. त्यांच्यापैकी काही वर विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.त्या तिघांच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत
What's Your Reaction?