मेडिकल महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

मेडिकल महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 आदर्श शिक्षण संस्थेचे सोनाजीराव क्षिरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महात्मा गांधी रुग्णालय यांच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण व पर्यावरण स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनाची कार्यक्रम अधिकारी तथा उपप्राचार्य डॉ. गणेश पांगरकर यांनी पर्यावरण संवर्धन विषयक सविस्तर माहिती देऊन महाविद्यालय परिसरात कडूनिंब वढ पिंपळ आधी वृक्षांसह विविध औषधी गुणधर्म असणारे महाविद्यालयाच्या वाटिकेमध्ये लागवड करण्यात आली तसेच सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवले

यावेळी कार्यक्रमास डॉ.वसाहेब भांगे डॉ. अजय कुलकर्णी डॉ.लक्ष्मण वाघ डॉ.गणेश खेमाडे यांचे सह राष्ट्रीय सेवा योजनेचे सचिव श्रेयश ढाकणे यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow