कार दुचाकीचा भीषण अपघात, दोन प्राध्यापकांचा मृत्यू
बीड नगर रोड महामार्गावरील जिओ पेट्रोल पंपा समोर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये दोन प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना आज सकाळी सोमवारी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. सदर घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरूर कासार येथील कालिकादेवी महाविद्यालयात कार्यरत असणारे ,प्राध्यापक शहादेव शिवाजी डोंगर रा. जाट नांदूर आणि अंकुश साहेबराव गव्हाणे हे सकाळी आपल्या दुचाकीवरून बीड नगर रोड वरून शिरूर कासार कडे जात होते. यावेळी नगर रोडवरील जिओ पेट्रोल पंपा समोर आले असता, त्यांच्या दुचाकीला कार क्र. एम एच 14 जेई 5372 ने जोराची धडक दिली. यामध्ये दोन्ही प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोन्ही प्राध्यापक शिरूर कासार येथील कालिकादेवी महाविद्यालयात कार्यरत होते. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात होताच दुचाकीने तर पेठ घेतला आणि जळून खाक झाली.यानंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. आज गुरु पौर्णिमे दिवशीचे दोन गुरुवर काळाचा घाला आल्याने जिल्हाभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?