बीडमध्ये कपड्याच्या दुकानात चोरी करताना दोन महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीड शहरामध्ये एका कपड्याच्या दुकानात चोरी करताना ,दोन महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. ही घटना बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे.
बीड शहरातील धोंडीपुरा भागामध्ये मनसबदार कॉम्प्लेक्स येथे शैलेश रोहिदास मस्के राहणार बीड यांचे‘मी अॅण्ड मॉम किडस् वर्ल्ड’ हे कपड्याचे दुकान असून या दुकानात दोन महिला कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.त्यांनी कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानातील तेरा गाऊन, तीन ब्लेझर, चार वनपीस आणि तीन फ्रॉक लंपास केले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे यामध्ये सुमारे 50 हजार रुपये किमतीचा माल लंपास झाला आहे याप्रकरणी संबंधित महिलांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
What's Your Reaction?






